नाशिक: दोन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

धक्कादायक: दोन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

नाशिक (प्रतिनिधी): दोन सख्ख्या अल्पवयीन अल्पवयीन बहिणींना मोबाईलमधील अश्‍लील व्हिडिओ दाखवून बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पीडित मुलींच्या आईने याबाबत फिर्यादी दिली आहे.

सन २०१७ पासून ते ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत आरोपी तरुणाने फिर्यादी यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मोठ्या मुलीस ती घरात एकटी असल्याची संधी साधून कशाचे तरी आमिष दाखवून तिला निर्वस्त्र करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

तसेच सन २०२० पासून ते आजपर्यंत फिर्यादी महिलेच्या १५  वर्षीय अल्पवयीन लहान मुलीलाही आरोपीने मोबाईलमधील अश्‍लील व्हिडिओ दाखवून तिच्यावरही बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुम्हाला जिवे ठार मारीन, अशी धमकी या तरुणाने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या तरुणाने अंबड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
पुन्हा एकदा जळीतकांड: जळालेल्या कारमध्ये आढळला मृतदेह, सुवर्णा वाजे प्रकरणाची पुनरावृत्ती ?
मन सुन्न करणारी घटना! स्विमिंग करताना तरुणाला हार्ट अटॅक
नाशिक: पंचवटीत व्यावसायिक स्पर्धेतून दोघा भावांना मारहाण

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here