इगतपुरीच्या रिसोर्ट मालकास ग्राहक न्यायालयाने ठोठावला चौदा लाख रुपयांचा दंड

इगतपुरीच्या रिसोर्ट मालकास ग्राहक न्यायालयाने ठोठावला चौदा लाख रुपयांचा दंड

नाशिक (प्रतिनिधी): अॅडव्हेंचर पार्कचे आकर्षण लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आहे. या खेळात साहसी खेळ खेळले जातात.

या साहसी खेळात अनेक रिसॉर्ट चालक सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात परिणामी मोठे अपघात झाल्याने अनेकांचे मृत्यू होतात.

पर्यटक वेळेवर सावधगिरी बाळगत नाहीत किंवा सुरक्षा नियमांची तसेच यंत्रणांची तपासणी करत नाहीत परिणामी अपघातांना सामोरे जावे लागते.

नाशिक जिल्ह्यात पर्यटन करण्यासाठी आलेल्या पारख कुटुंबाला हाच अनुभव आला . काही दिवसांचे पर्यटन मौज मजा करण्यासाठी आलेल्या या कुटुंबाला गेल्या वर्षभरापासून शारीरिक मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.  इतकच नाही तर आयुष्यभराची अद्दल घडली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

काय होती घटना:
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट या रिसोर्ट मध्ये अक्टीव्हीटीज अॅडव्हेंचर पार्क आहे. या पार्क मध्ये २९ डिसेंबर २०१९ रोजी नाशिकच्या कृती पटेल यांनी कुटुंबियांसाठी एक दिवसाचे बुकिंग केले होते. यात एका दिवसाचे अॅडव्हेंचर खेळासाठी लागणारी सर्व फी सुद्धा चालकास देण्यात आली होती.

अॅडव्हेंचर पार्क मधील खेळ खेळून झाल्यानंतर सिद्धी पारख झिपलाईन राईड येथे आले. झिप लाईन राईड करताना प्रशिक्षकाने हार्नेस लावले आणि राईड करता केबलला हुकने लटकावले. राईड सुरक्षेसाठी लागणारे हेल्मेट, कनी कॅप आणि इतर साहित्य देण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच बेल्ट व्यवस्थित बांधला नव्हता. राईड सुरु करण्याआधी सिद्धी यांनी प्रशिक्षक यांना सुरक्षेबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व व्यवस्थित असल्याच सांगितलं. 

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

राईड सुरु केल्यानंतर जमिनीपासून २० ते २५ फुटावर असताना सिद्धी पारख यांचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि पारख जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर इजा झाली होती. सिद्धी यांना उपचाराकरिता नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. काही शत्रक्रिया करण्यासाठी सिद्धी यांना मुंबईला नेण्यात सुद्धा नेण्यात आले होते. यात पारख याचा ११ लाख रुपये खर्च झाला होता. नियमाचे पालन न केल्याने हा अपघात घडला असल्याचा त्यांनी आरोप केला तसेच कोणतीही मदत न केल्याने अखेर पारख यांनी २८ जुलै २०२० रोजी  ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

ग्राहक न्यायालयाचा आदेश:
पारख यांनी न्यायालयात अॅडव्हेंचर पार्क चालकाकडून सर्व खर्चासह १७ लाखाची मागणी केली होती. मात्र ग्राहक न्यायालयाने रुग्णालयातील आता पर्यंतचा खर्च १२ लाख ३२ हजार ९२६, मानसिक आणि शारीरिक त्रासाकरिता १ लाख ५० हजार रुपये आणि अर्जाचा खर्च २५ हजार रुपये  असे एकूण चौदा लाख रुपये अॅडव्हेंचर पार्क चालकाने पारख यांना देण्याचे आदेश दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790