नाशिक: महिलेने रस्त्यातच दिला जुळ्या मुलींना जन्म, परिसरातील महिलांनी दाखविली तत्परता…
नाशिक (प्रतिनिधी): औदुंबर नगर, अमृतधाम येथील रस्त्यावरून मोलमजुरी करणारी शितल विकी कांबळे ही गरोदर महिला जात असतांना त्या महिलेच्या पोटात कळा सुरू झाल्या…
ती महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसली. परिसरातील महिलांनी व नागरिकांनी जवळच असलेले प्रख्यात डॉ.राजेंद्र बोरसे व प्रभागाच्या नगरसेविका सौ.प्रियंका धनंजय माने यांना फोन केला.
डॉ.राजेंद्र बोरसे हे त्यांच्या क्लिनिक मध्ये असलेले पेशंट सोडून तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले
आणि त्या महिलेची डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली त्या महिलेने दोन जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला…
तोपर्यंत प्रभागाच्या नगरसेविका सौ.प्रियंका धनंजय माने या प्रभागात असलेले मनपाचे आरोग्य केंद्र इथून डॉ.बस्ते व दोन महिला परिचारिका वैशाली धिवर, छाया जाधव यांना आपल्या वाहनात तात्काळ घेऊन पोहोचल्या.
पंचवटी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर यांना फोन करून डॉ.राजेंद्र बोरसे यांचे बोलणे करून दिले. डॉ. राजेंद्र बोरसे यांनी सदर घडलेला प्रकार डॉ.विजय देवकर यांना सांगितला व लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स बोलवून सदर महिलेला इंदिरा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले. डिलिव्हरी झालेली महिला शितल विकी कांबळे व तिने जन्म दिलेल्या दोन्ही जुळ्या मुली या सुखरूप आहेत. तात्काळ डॉ.राजेंद्र बोरसे व प्रभागाच्या नगरसेविका सौ.प्रियंकाताई धनंजय माने या आल्या, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मदतीस भामरे आजी,कोलते ताई वानखेडे ताई, जाधव ताई, विलास कारेगावकर, ज्ञानेश्वर सोमासे, मनोज कोलते, रमेश वानखेडे व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने आल्या होत्या.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790