Breaking News: नाशिकच्या सुखलाल दगडू तेली चांदवडकर यांच्या दुकानावर वनविभागाचा छापा…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सुप्रसिद्ध दगडू तेली यांच्या दुकानावर वनविभागाने छापा मारला आहे.
वन्यजीवांच्या अवयवांची विक्री केल्याप्रकरणी रविवार पेठ येथील सुखलाल दगडू तेली (चांदवडकर) यांच्या तीन नंबरच्या सुकामेवा व काष्ट औषधी वनस्पती या दुकानावर छापा टाकून वन्यजीवांचे अवयव जप्त केले.
या सर्व अवयव हे कुठल्या वन्यजीवांचे आहे. याची ओळख वनविभागाकडून केली जात आहे.
याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९, ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11061,11059,11053″]
रविवार पेठ येथील तेली गल्ली येथे सुखलाल दगडू तेली चांदवडकर यांच्या मालकीच्या सुकामेवा व काष्ट औषधी वनस्पती या तीन नंबरच्या दुकानात संरक्षित वन्यजीवांच्या अवयवाची सर्रास विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी लागली. या माहितीच्या आधारे सोमवारी (ता.४) वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सायंकाळच्या सुमारास या दुकानावर छापा मारला असता पथकास याठिकाणाहून विविध वन्यजीव यांचे अवयव मिळून आले. पथकाने सदरचे सर्व अवयव जप्त केले. जप्त सर्व अवयवांची ओळख पटविण्याचे काम विभागाकडून केले जात आहे.