दुर्दैवी! उघड्या डीपीचा शॉक लागल्याने नाशिक शहरात बालकाचा मृत्यू

दुर्दैवी! उघड्या डीपीचा शॉक लागल्याने नाशिक शहरात बालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): वीज कंपनीच्या उघड्या डीपीचा शॉक लागल्याने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक शहरात घडली आहे.

शहरातील नाशिक पुणे रोडवरील बजरंग वाडी येथील संताजीनगर येथे ही घटना घडली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

अरमान मुन्ना अन्सारी (वय: ८) असे मृत बालकाचे नाव आहे.

संताजीनगरमध्ये असलेल्या उघड्या डीपीचा शॉक अरमानला लागला होता.

या डीपीला कोणत्याही प्रकारची संरक्षण भिंत अथवा जाळी लावलेली नव्हती. तसेच, त्याचा दरवाजाही उघडा होता. गेल्या आठवड्यात. २६ जून रोजी लहान मुले संताजीनगरच्या मेकळ्या मैदानात खेळत होती. त्यात अरमानचाही समावेश होता. खेळता खेळता अरमान उघड्या डीपीजवळ आला. तेथे त्याचा चुकून हात लागल्याने तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,  उपचार सुरू असतानाच शनिवारी (२ जुलै) अरमानचा मृत्यू झाले. अरमानचे वडील हे बिगारी कामगार आहेत. अरमानच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here