सोमेश्वर धबधब्यात पोहणे जीवावर बेतले, डोळ्यादेखत 2 मित्र पाण्यात बुडाले, नाशिकमधील घटना
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूररोडवरील सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोघे मित्र गोदावरी नदीपात्रात बुडाले आहेत.
राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे.
त्यामुळे जीवाची पार लाही लाही होत आहे.
अशातच नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पोहणे दोन तरुणाच्य जीवावर बेतले आहे.
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डोळ्यादेखत दोन मित्र पाण्यात बुडाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी अशी पाण्यातून बुडालेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोघं तरुण देवळाली परिसरात राहणारे होते. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी आपल्या चार मित्रांसह नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर फिरण्यासाठी आले होते.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10488,10479,10475″]
धबधब्यावर फिरल्यानंतर चारही मित्रांनी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र,काही वेळानंतर अचानक धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी दोघे पाण्यात बुडायला लागले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक जण बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने धाव घेतली. पण, दोघही पाण्यात बुडाले.
आज दुपारच्या सुमारास चार मित्र सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी आले. ते पोहणे आणि आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. मात्र, त्याचवेळी वाहत्या पाण्याचा आणि नदीपात्राच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे यातील दोन जण बुडाले. अन्य दोघांनी आरडाओरडा केल्याने तेथे उपस्थित असलेल्यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. त्याचवेळी काही जणांनी मनपा अग्निशमन विभागाला तसेच पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या दोघांना शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन्ही मित्रांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. दोन्ही मित्रांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले या घटनेमुळे त्यांनी एकच आक्रोश केला आहे.