
नाशिक: “मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करीन” म्हणत महिलेवर सहा वर्षे अत्याचार
नाशिक (प्रतिनिधी): “मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करीन,” असे आमिष दाखवून महिलेवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिलेशी आरोपीने ओळख वाढवून मैत्री केली.
त्यानंतर “माझ्या पत्नीपासून मला खूप त्रास असून, मी तिला घटस्फोट देणार आहे.
घटस्फोट दिल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे खोटे सांगून पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले.
या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने तिच्याशी मैत्री केली. काही दिवसांनंतर आरोपीने पीडितेशी अंगलट करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी पीडित महिलेने लग्नाबाबत आरोपीकडे विचारणा केली. उलट आरोपीने शिवीगाळ करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी देत लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार दि. १ ऑक्टोबर ते १९ फेब्रुवारी दरम्यान घडला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात आरोपी इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडोळ करीत आहेत.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10483,10479,10475″]
दरम्यान याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ३७६, ३७६ (१)(२)(द), ४१७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०१६९/२०२२) करण्यात आला आहे.