
नाशिक: मूल होत नसल्याने होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): मूल होत नसल्याने होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
यावेळी पती दुसरे लग्न करत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
दुसरे लग्न करण्याची धमकी देत सतत पत्नीचा छळत होत असल्याने त्याला कंटाळून पत्नीने घराशेजारील झाडाला गळफास घेत जीवन संपविल्याची घटना त्र्यंबकरस्त्यावरील वासळी गावात घडली आहे.
मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून जावयासह सासऱ्यांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूल होत नसल्याने कृष्णा गोविंद सोहळे (रा. वासाळी) व पत्नी मैनाबाई कृष्णा सोहळे यांच्यात नेहमीच वाद होत होते. अनेकदा पती कृष्णा हा मूल होत नसल्याने दुसरे लग्न करण्याची धमकी देत मैनाबाईला दारूच्या नशेत मारहाणही करत होता.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10464,10461,10449″]
रोजच्या या छळाला कंटाळून मैनाबाईने १४ एप्रिलला सकाळी घराच्या शेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. तशी फिर्याद मुलीचे वडील मधुकर लखमा वाघ (रा. ढोगडीपाडा, ता.त्र्यंबकेश्वर) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पती कृष्णा व सासरे गोविंद गंगा सोहळे (रा. दुगारवाडी) यांच्या विरोधात छळ आणि आत्महत्येस प्रवृत्ते केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शाम जाधव तपास करत आहेत.