
नाशिक: “मुलींना मोबाईल का दाखवतो” म्हटल्याचा राग; तरुणाचा चाकू भोसकून खून
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात किरकोळ कारणावरून हाणामाऱ्या आणि खून होण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
असाच एक प्रकार गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
मुलींना मोबाईल का दाखवितो येथून निघून जा, असे म्हटल्याचा राग आल्याने एका तरुणाने एकास चाकू भोसकून ठार केले.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित गौरव जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश ताटे, असे मयत इसमाचे नाव आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10449,10446,10438″]
बुधवारी (ता.१३) रात्री आठला अजिंक्य जाधव हा उत्कर्षनगर भागात असताना परिसरातील मुलींना मोबाईल दाखवीत असताना रमेश ताटे यांनी अजिंक्य यास मुलींना मोबाईल का दाखवितो, येथून निघून जा असे म्हटले. या गोष्टींचा राग अजिंक्यचा भाऊ गौरव जाधव यास समजले. या गोष्टीचा राग आल्याने त्याने उपस्थित लोकांच्या समोर धारदार चाकूने रमेश ताटे यांच्या हात व छातीवर सपासप वार केले. या झटापटीमध्ये गौरव यादेखील जखमी झाला, तर रमेश ताटे हे ठार झाले. याप्रकरणी मनीष रूपवते यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.