नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील तारवाला नगर येथील सिग्नलवर चालत्या मारुती ८००ने पेट घेतल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून गाडी जवळपास ८० टक्के जळून खाक झाली आहे.
यांबाबत अधिक माहिती अशी की,मखमलाबाद येथील रहिवाशी रामदास तुकाराम काकड हे आहे.
ते आपली मारुती ८०० क्रमांक MH15EF9164 यातून पंचवटी कडून घरी परतत होते.
दिंडोरी रोडवरील तारवाला नगर येथे अचानक पेट घेतला.त्याक्षणी काकड हे गाडीच्या खाली उतरले. एका सुजाण नागरिकांनी सदर बाब ही अग्निशामक दलाला कळविली. काही वेळातच अग्निशामक दल व घटनास्थळी पोहचले आणि आग आटोक्यात आणली. यावेळी लिडींग फायरमन अर्जुन पोरजे, फायरमन नाना गांगुर्डे,शिवाजी फुगट,वाहनचालक अभिजित देशमुख यांनी आग आटोक्यात आणली,तसेच यावेळी स्टेशन ऑफिसर आर एम बैरागी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: हृदयद्रावक; पाण्याच्या बादलीत पडून सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
देव तारी त्याला कोण मारी… रुळ ओलांडताना रेल्वे येताच साधू महाराज रुळांमधील जागेत झोपले…
पुलावरून आत्महत्या करताना ज्याला वाचविले, काही दिवसांनी त्यानेच घेतली जळत्या चितेवर उडी