
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील ‘या’ भागात १ एप्रिल २०२२ रोजी पाणीपुरवठा नाही
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.
नाशिकरोड विभागात मुक्तीधाम जलकुंभावरुन येणारी मुख्य वितरण वाहीनीला मोठयाप्रमाणात गळती सुरु झाल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.
🔎 हे वाचलं का?: नांदूर मध्यमेश्वरात ६,२१५ पक्ष्यांची नोंद; ११० सायकलस्वारांची पर्यावरण जनजागृती रॅली
परंतु कामाचे स्वरुप मोठे असल्याने कामास विलंब लागणार आहे.
त्यामुळे नाशिकरोड विभागातील प्र.क्र. 19 मधील सिन्नर फाटा परीसरात स्टेशन परिसरात तसेच प्र.क्र. 22 मधील खर्जुल मळा गाडेकर मळा परीसरात शुक्रवार दिनांक 01/04/2022 रोजीचा सकाळ सत्राचा पाणी पुरवठा होणार नाही व दुपार सत्र व सांयकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


