Amazon

नाशिकच्या ‘या’ हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मित्रांचा राडा; डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण (CCTV Video)

नाशिकच्या ‘या’ हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मित्रांचा राडा; डॉक्टर पुत्राला बेदम मारहाण (CCTV Video)

नाशिक (प्रतिनिधी): रुग्णावर उपचार का करत नाही असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये राडा केला.

तसेच शिवीगाळ करत डॉक्टरच्या मुलालाही बेदम मारहाण केली.

हा सगळा प्रकार सिसीटिव्हीमध्ये कैद झाला असून

म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे डॉ अरुण विभांडिक यांचे लीलावती हॉस्पिटल आहे. याठिकाणी काल (दि १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास विजय धात्रक या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. रुग्णावर प्राथमिक उपचार केले जात होते. याच वेळी धात्रक याचे मित्र ओंकार जाधव व भैया शिराळ व त्यांचे तीन साथीदार हे याठिकाणी आले.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड परिसरातील कामे ३ आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश

त्यांनी रुग्णावर उपचार करण्यास विलंब का होत आहे? या कारणावरून वाईटसाईट शिवीगाळ सुरु केली. विजयला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही असा दम देत डॉ विभांडिक यांचा मुलगा सौरभ विभांडिक याच्यासोबत वाद घातला. त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या नाकावर वार केले. यानंतर जखमी सौरभवर उपचार करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  सुरगाण्यात ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप; नाशिक शहरापासून ५३ किलोमीटरवर केंद्रबिंदू

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10201,10203,10193″]

रुग्णावर दवाखान्यातील स्टाफ उशिराने उपचार का करत आहात? त्याला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही असा दम देत दिंडोरी रोडवरील लीलावती हॉस्पिटलमध्ये राडा घातला. याप्रकरणी डॉ. अरुण विभांडिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र रुग्णाचे हे मित्र सध्या फरार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790