चिंताजनक: नाशिकचे दोन विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये
नाशिक (प्रतिनिधी): रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे.
गेल्या २४ तासात युक्रेन येथील परिस्थिती अतिशय चिघळली आहे.
भारतातील जवळपास २० हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये या बिकट परिस्थितीत अडकले आहेत.
त्यापैकी नाशिकचे दोन विद्यार्थी आहेत. युद्ध सुरु झाल्यामुळे सर्वच देशांनी युक्रेनला ‘नो फ्लाय झोन’ घोषित केले आहे. त्यामुळे युक्रेनसाठी सर्व प्रकारच्या प्रवासी विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नाशिकचे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. अदिती देशमुख आणि प्रतिक जोंधळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. युद्ध सुरु झाल्यापासून त्यांचाशी संपर्क होऊ शकलेला नाही.
- नाशिक: डॉ. सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा…
- नाशिक: ब्लॅकमेल करत भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर सलग दोन वर्षे बलात्कार
मात्र आपल्या मुलांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला आहे. दोन्ही विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनच्या खर्कीव मेडिकल होस्टेलमध्ये सध्या ते वास्तव्यास आहेत. तेथील काही फोटो अदिती आणि प्रतीकने त्यांच्या महाराष्ट्रातील मित्रांना पाठवले आहेत. सध्या ते तेथील बेसमेंटमध्ये आहेत. मात्र गेल्या २४ तासात त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणावे अशी विनंती त्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.