नाशिक (प्रतिनिधी): तिमाहीत कॅश बॅकसह सहा महिन्यात गुंतवलेली रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवीत दोघांनी एकाला ५५ लाख २५ हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मुंबईतील रवी बारकू गवळी आणि ऋषी गवळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रवी आणि ऋषी गवळी यांनी २ जुलै २०२२ ते १३ जुलै २३ दरम्यान चेतनानगर येथील वैभव यादवराव देवरे (३८, सीमा पार्क अपार्टमेंट) यांना तीन महिन्याला कॅशबॅक आणि सहा महिन्यात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवीत मंथली कॅश बॅक प्लॅन योजनेच्या नावाखाली गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवीत पैसे गुंतवायला भाग पाडले.
त्यानंतर कुठलेही लाभ किंवा मुद्दल रक्कमही न देता सुमारे ५५ लाख २५ हजार रुपयांना फसविले. याप्रकरणी वैभव देवरे यांच्या तक्रारीवरून दोघा संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.