नाशिक: 52 हॉटेल्सला पार्सल सुविधेसाठी परवानगी

नाशिक (प्रतिनिधी):जिल्ह्यातील १ हजार ५७२ किराणा दुकानांची पाहणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत करून संबंधितांना सोशल डिस्टन्सी व लॉकडाउनच्या अनुषंगाने आवश्यक सुचना देवून परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने किरकोळ किराणा दुकानदार १७ हजार ८६३, घाऊक दुकानदार ३ हजार ७०३ आणि २ हजार ८२९ वितरकांचा समावेश आहे. तसेच या कालावधीत ३० उत्पादकांना उत्पादन सुरू ठेवण्यासाठी व ५२ हॉटेल्सला पार्सल सुविधा पुरविण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कळविले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: उद्यापासून (दि. ३ ऑक्टोबर) सिटी लिंक बसच्या 'या' क्रमांकाच्या मार्गात बदल !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790