Ad: Latest Job Openings in Nashik City.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या येवल्यातील उद्योजक आणि राजकारणी पंकज पारख या नावाची काही वर्षांपूर्वी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली होती.
याला कारण ठरलं होतं त्यांनी घातलेला 4 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला 1.30 कोटींचा शर्ट.
पंकज पारख यांच्या शर्टाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता अंगावर किलोभर सोने बाळळगल्यामुळे या गोल्डमॅनला नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने (EOW) अटक केली आहे.
पंकज पार्क संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप पंकज पारख यांच्यावर आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पंकज पारख यांना अटक केली आहे.
येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पंकज पारख यांना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी पारख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन गेले असून शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Ad: सावरकर नगर, गंगापूर रोड येथे बंगला विकणे आहे.
कशी केली अटक?
नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फ्लॅटमधून पारख यांना अटक केली. पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार 21 कोटी 96 लाख 99 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणातील संशयित पंकज पारख यांच्याबद्दलची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने संशयित पारख यांचा माग काढत त्यांना अटक केली.
कोण आहेत पंकज पारख?
पंकज पारख हे सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून कै. सुभाषचंदजी पारख पतसंस्थेचे संस्थापक आहेत. पारख हे येवला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षही आहेत. काही वर्षांपूर्वी पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टाने त्यांना गिनीज बुकमध्ये स्थान मिळवून दिले होते. पंकज पारख यांनी त्यांच्या वाढदिवशी सुमारे चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घातला होता, ज्याची किंमत 1 ऑगस्ट 2014 रोजी अंदाजे 98 लाख, 35 हजार 99 रुपये होती.