नाशिक: श्रावणी सोमवारनिमित्त हे आहे सिटीलिंक बसचे नियोजन…

नाशिक (प्रतिनिधी): श्रावणी सोमवारनिमित्त महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून त्र्यंबकेश्वरसाठी वीस अतिरिक्त बसचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून दर श्रावणी सोमवारी नाशिक ते त्र्यंबकेश्वर दरम्यान १२५ अतिरिक्त फेऱ्या होणार आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे भाविकांसाठी बससेवा उपलब्ध करून द्यावी लागते. नाशिक महापालिकेकडे बससेवा हस्तांतरित झाल्यानंतर अतिरिक्त बससेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन २० अतिरिक्त बसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

नाशिक रोडवरून द्वारका मार्गे त्र्यंबकेश्वर येथे दहा बस, तर निमाणी-त्र्यंबकेश्वर मार्गावर दहा अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत.

२५ नियमित व वीस अतिरिक्त याप्रमाणे ४५ बस नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणार आहे. सिटीलिंक कंपनीच्या बस त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. त्यामुळे भाविकांची पायपीटदेखील थांबणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790