नाशिक: 25 वर्षीय प्रियकराचा लग्नास नकार; महिलेने केले आत्महत्येस प्रवृत्त! मृतदेह महामार्गावर

25 वर्षीय प्रियकराचा लग्नास नकार; ४५ वर्षीय महिलेने केले आत्महत्येस प्रवृत्त! मृतदेह टाकला महामार्गावर

नाशिक (प्रतिनिधी): ४५ वर्षीय महिलेवर प्रेम करणे एका २५ वर्षीय प्रियकराच्या जीवावर बेतले.

प्रियकराने आपल्याशीच लग्न करावे यासाठी प्रेयसीने त्याचा शारीरिक व मानसिक छळ केला.

त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

प्रियकराने प्रेयसीच्या घरीच आत्महत्या केल्यानंतर संशयित प्रेयसीने तिचा २० वर्षीय मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा मृतदेह महामार्गावर टाकत अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी संशयित महिलेसह दोघा तरुणांच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक सुभाष जाधव या वेळी उपस्थित होते. आडगाव शिवारातील नवव्या मैलाजवळ मोकळ्या जागेत २६ फेब्रुवारीला युवकाचा मृतदेह सापडला होता. गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्याने संशय बळावल्याने वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर व गुन्हे शोध पथकास तपासाचे निर्देश दिले. मृत युवक हा कंडारी कोळीवाडा, भुसावळ (जि. जळगाव) येथील रमेश रवींद्र मोरे (वय २५) असून, सध्या ओझरमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

त्यानंतर छाया गांगुर्डे या महिलेसोबत रमेशचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे तपास केला. त्यात छाया व रमेश यांच्यात एक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे, तसेच लग्नासाठी तगादा लावून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुढे आले. दरम्यान, छायाने मुलगा तुषार गांगुर्डे व त्याचा मित्र आकाश पवार यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मोटारसायकलवर दोघांमध्ये मृतदेह बसलेल्या अवस्थेत ठेवून घटनास्थळी नेऊन टाकला.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

आडगाव पोलिसांनी यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हलवून छाया रवींद्र गांगुर्डे (वय ४२), तुषार रवींद्र गांगुर्डे (वय १९, दोघेही रा. मिलिंदनगर, राजवाडा, ओझर मिग) व आकाश पवार (रा. तांबट गल्ली, मर्चंट बँकेसमोर, ओझर) यांना अटक केली आहे. उपनिरीक्षक जाधव, पाथरे, सहाय्यक उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, हवालदार सुरेश नरवडे, विजयकुमार सूर्यवंशी, वैभव परदेशी, देवानंद मोरे, नितीन शिंदे, तसेच तांत्रिक विश्‍लेषण शाखेचे सहायय्यक निरीक्षक बेडवाल यांनी ही कामगिरी केली.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

मयत रमेश आणि चार मुलांची आई असलेली संशयित महिला यांची आेळख बसमध्ये प्रवासात झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल नंबर घेत अोळख वाढवली. तरुण या महिलेला भेटण्यास येत होता. ताे या महिलेच्या प्रेमात इतका वेडा झाला की तो तिच्या घरीच राहू लागला. त्याने गावी जाऊन लग्न करू नये म्हणून ही महिला त्याचा छळ करत असल्याने त्याने कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790