Breaking

नाशिक: दारूच्या बाटलीचे पैसे मागितल्याने टोळक्याची वाईन शॉपच्या कामगारास मारहाण

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड भागात दारूच्या बाटलीचे पैसे मागितल्याने टोळक्याने वाईन शॉपमध्ये शिरून कामगारास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दगड फेकून मारण्यात आल्याने कामगार जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अंबड-इंदिरानगरातील तक्रारदारांचा ७० लाखांचा मुद्देमाल परत

रावेंद्र विजयबहाद्दूर नामदेव (२४ रा.विजय ममता थिएटर समोर दत्तमंदिर,शिवाजीनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रावेंद्र नामदेव हा युवक जेलरोड येथील कैलास सोसायटीत असलेल्या कॅपिटल वाईन शॉप या दुकानात कामास असून सोमवारी (दि.११) सायंकाळी तो काऊंटर सेवा बजावत होता. यावेळी अज्ञात चार तरूण दुकानात आले. संशयितांनी रावेंद्रकडे दारूच्या बाटलीची मागणी केली.

🔎 हे वाचलं का?:  सांगलीतील सराईत घरफोड्याला नाशिकमध्ये अटक; १५ लाखांचे सोने हस्तगत, १० घरफोड्यांची उकल

बाटली देण्यापूर्वी रावेंद्रने पैश्यांची मागणी केल्याने ही घटना घडली. पैसे मागितल्याच्या रागातून सशयित चार जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत जबरीने वॉईन शॉपमध्ये प्रवेश करून त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यानंतर दुकानाबाहेर पडलेल्या टोळक्यातील एकाने दगड फेकून मारल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790