नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील बाजी प्रभू चौकात आज सकाळी एका टोळीने राकेश कोष्टी या सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला.
या घटनेत राकेश कोष्टी गंभिर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राकेश कोष्टीचे जया दिवे, किरण शेळके, ठाकूर यांच्याशी जुने वाद होते. या वादातून त्याच्यावर आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास सिडकोतील बाजीप्रभु चौकात गोळीबार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समजते.
या हल्ल्यात २ गोळ्या त्याच्या कमरेत व पोटात शिरल्याने तो जखमी झाला.
त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले होते.
पोलिसांनी जया दिवेला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. घटना समजताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे त्वरित फिरवत पोलिसांनी जया दिवेला ताब्यात घेतले.
![]()


