नाशिकमध्ये 28 वर्षीय विवाहितेने संपवलं जीवन.. ‘शेवटच्या क्षणी आईला फोन केला, म्हणाली…’

नाशिकमध्ये 28 वर्षीय विवाहितेने संपवलं जीवन.. ‘शेवटच्या क्षणी आईला फोन केला, म्हणाली…’

नाशिक (प्रतिनिधी): आजही विवाहितेच्या मानसिक व शारीरिक छळाच्या घटना समोर येत आहेत. यात हुंडा, संशय, मानसिक त्रास या कारणातून सासरचा मंडळींकडून विवाहितेचा छळ होतो.

परिणामी सोन्यासारखा संसार क्षणात पोरका होतो. अशीच एक दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली असून विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवलं आहे.

नाशिकच्या पंचवटी भागात राहणाऱ्या विवाहितेने विष प्राशन करत मृत्यूला कवटाळल्याची घटना समोर आली आहे. यावेळी शेवटचा फोन आईला करत ‘माझ्या नीलला न्याय दे’ अशी आर्त हाक या माउलीने आपल्या माउलीला घातली आहे.

पिढीजात संपत्तीत हिस्सा न देण्यासाठी तिचा छळ केल्याचे समोर आले असून पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरे या तरुणीचा 2016 रोजी नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर याच्यासोबत विवाह झाला होता. बेलगावकर कुटुंबीय मेन रोड परिसरात एकत्र राहत होते. या ठिकाणी पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय हिरावाडी येथे राहावयास गेले. या दोघांच्या संसारात आणखी एका पाहुण्याचे आगमन झाले.

दरम्यान कुटुंबीय एकत्र राहत असल्याने कोमल आणि तिची जाऊ मीनाक्षी यांच्यात सातत्यने वाद होत असल्याने दोघे वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास गेले. या ठिकाणी नव्या संसाराला सुरवात करताना कोमलने स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू करून सर्व संसारोपयोगी साहित्य देखील खरेदी केले. काही दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर जुने घर दरुस्त झाले असल्याचा फोन जाऊबाई मिनाक्षी हीने सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

कोमलनेदेखील पती अभिजीत यांना आपण तिकडे राहायला जाऊ असे सांगितले असता, मला तिकडे राहायचं नाही, मला ते घर पण नको असे बोलून विषय संपवावा असे सांगितले. मात्र कोमलने स्वतः जाऊन सासूकडे याबाबत विनंती केली असता सासूने नकार दिला. सासूने नकार दिला असता जुन्या संपत्तीमध्ये मुलगा निलराज याचे देखील नाव घावे असे कोमल सासूला बोलली असता त्यांनी देखील वाद घातले.

यानंतर कोमलला सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरवात झाली. तर पती अभिजीतने देखील तू प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असशील तर तुला घटस्फोट देऊन माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी दिली. तसेच कोमलच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देणे सुरू केले. घडत असलेला सर्व प्रकार कोमलने आई मंगलाबाई व भाऊ कमलेश देवरे याला कळविला होता. दरम्यान 27 जानेवारी रोजी रात्री उशिरा एका अनोळखी क्रमांकावरून कोमलच्या आईला फोन आला.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

‘आई आई माझ्या निल ला न्याय दे जो’ असे बोलून फोन कट झाला. कोमलची आई व वडिलांनी रेल्वेने रात्री नाशिक गाठले असता 9 वाजता डॉक्टरांनी तिने विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0046/2023, भारतीय दंड विधान: 306, 506, 34 प्रमाणे)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790