नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील जेलरोड परिसरातील शिवाजीनगर येथून पावभाजीचे पार्सल घेऊन घरी परतणाऱ्या भाजीविक्रेत्याला चोरट्यांनी शस्त्रांची भीती दाखवत ८ हजार रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली.
जेलरोड परिसरात भाजीविक्रीचा व्यवसाय करणारे शत्रुघन रामरतन गुप्ता शनिवारी (दि.२४ ऑक्टोबर) रोजी रात्री ९ वाजता जेलरोड येथील पाण्याच्या टाकीकडून शिवाजीनगरला पावभाजी आणण्यासाठी गेले होते. तिकडून परत येत असतांना संशयित आरोपी सुरेश राजाराम म्हस्के व त्याच्यासोबत असलेल्या ३ साथीदारांनी गुप्ता यांची मोटारगाडी अडवली. गुप्ता यांना गाडीचे काच खाली करण्यास सांगून, मानेवर शस्त्र ठेवून भीती दाखवली. शिवीगाळ व धमकी देत गुप्ता यांच्याकडील ८ हजारांची रोकड काढून घेतली. तसेच गुप्ता यांना जर पोलिसांना सांगितले तर तुझा गेम करू अशी धमकी देत चोरटयांनी पळ काढला.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790