नाशिक (प्रतिनिधी) : वेगवेगळ्या सुविधांचा फायदा मिळवण्यासाठी आपल्या खात्याचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे असे सांगत आरोपीने वेळोवेळी ट्रान्झॅक्शन ओटीपी विचारून तब्बल २२ लाख ९७ हजार १२९ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आरोपीने अनेक लोकांची या पद्धतीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कार्ड लिमिट वाढवण्यासाठी, रिवॉर्ड पॉईंट घेण्यासाठी, कॅशलेस मेडिकल सुविधेचा फायदा करून घेण्यासाठी, कागदपत्र पडताळणी करण्यासाठी, कॅशबॅक मिळवण्यासाठी, कार्ड ऍक्टिव्हशन करण्यासाठी, सरकारकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत, माहिती दिली नाही तर बँक खाते बंद होईल अशी अनेक कारणे सांगत आरोपी वेळोवेळी फिर्यादीकडून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून पैसे घेत असे. याप्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करत आहेत.