विभागीय आयुक्तांच्या बंगल्यातील चंदन वृक्षच चोरट्यांनी कापून नेला..
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
आता तर चक्क विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याच शासकीय निवासस्थानाच्या आवारातून चंदनाचं झाड कापून नेल्याची घटना घडली आहे.
सरकारी कार्यालयांसह बंगल्यांमधील चंदन वृक्षदेखील आता सुरक्षित राहिलेले नाही.
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानात रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी प्रवेश करत चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी आस्थापना असो किंवा निवासस्थानांच्या परिसरात चोरट्या मार्गाने सुरक्षारक्षकांची नजर चुकवत रात्रीच्या अंधारात प्रवेश करून चंदनाची झाडे तोडून पळविण्याचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या रांगेत असलेल्या विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या ‘राजगृह’ या शासकीय निवासस्थानात चोरट्यांनी प्रवेश केला. या निवासस्थानाच्या आवारात असलेले अंदाजे दोन ते तीन वर्षाचे चंदनाचे झाड चोरांनी हत्याराने कापले. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8894,8889,8887″]
येथील बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी अनिल पोपटराव गांगुर्डे यांनी मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी झाड कापून गाभ्यातील बुंधा घेऊन पोबारा केला आहे.