नाशिक (प्रतिनिधी) : इंदिरानगर परिसरात १६ ऑगस्ट २०११ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी आरोपींनी विनापरवाना गॅस सिलेंडर विक्रीसाठी ठेवले होते. यामुळे संबंधितांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकणाची सुनावणी करण्यात आली आहे.
सदरचा गुन्हा इंदिरानगर परिसरातील आरोपींच्या राहत्या घरी भारतनगर शिवाजीवाडी नाशिक येथे घडला. दरम्यान, आरोपी मोहम्मद नबी शेख व कादीर नबी शेख यांनी विनापरवाना अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर विक्रीच्या उद्देश्याने जवळ बाळगले. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ कलम ३ व ७ नुसार आणि लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ऑर्डर वर्ष २००० च्या नियंत्रण आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी सबळ पुरावे मिळवून, मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी ४ जानेवारी २०२१ रोजी झाली असून, आरोपींना १ वर्ष कारावास व ५०० रुपये दंड सुनावण्यात आला आहे.