💥 BREAKING NEWS: नाशिक: डुप्लिकेट पार्ट विकणाऱ्या एमजी रोडवरील मोबाईल दुकानांवर छापे

रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमती दीड हजार रुपयांपर्यंत येण्याची शक्यता

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील रुग्णालयांकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री होत आहे. यामुळे विक्री किमतीच्या कमाल ३०% जास्त आकारून राज्यात रेमडेसिविरची एमआरपी निश्चित करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. रेमडेसिविरच्या किमती १५०० रुपयांपर्यंत कमी करण्याचे अन्न व औषधी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. फेब्रुवारीपासून रुग्णालये व पुरवठादार घाऊक विक्रेत्यांनी विक्री किंमत कमी केली.

परंतु त्याचा लाभ रुग्णांना न देता विक्रेते छापील किमतीनुसार विक्री करत आहेत. पडताळणीत उत्पादकांनी रुग्णालये तसेच घाऊक विक्रेत्यांना रेमडेसिविरची विक्री ८०० ते १३०० रुपयांपर्यंत केल्याचे आढळून आले. तथापि, काही रुग्णालये खरेदी किमतीवर १० ते ३०% अधिक रक्कम आकारून रुग्णांना इंजेक्शन देत आहेत.

9 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790