नाशिक (प्रतिनिधी) : एकीकडे कोरोना संकट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागामधील कुटुंबातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांमुळे पडलेल्या अवकाळी पावसाने थैमान घालत, मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान केले आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करण्याच्या या निर्णयामुळे या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. तरी राज्यातील ३४९ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले जाणार आहे.
तर, नाशिकमधील चांदवड, येवला, सिन्नर, निफाड, पेठ, नाशिक, इगतपुरी, सुरगाणा, मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण, दिंडोरी, त्र्यम्बकेश्वर व नांदगाव या १५ तालुक्यांचा समावेश आहे. तरी, शुल्कमाफी संदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी. असे निर्देश शिक्षण विभाग व विद्यापीठांना दिले आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली आहे. त्यांनाही याचा लाभ होईल कि नाही याची स्पष्टता विद्यापीठाने अजून केली नाही.