नाशिक: मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड; एकूण ९ मोटारसायकल आणि १९ मोबाईल जप्त !

नाशिक: मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड; एकूण ९ मोटारसायकल आणि १९ मोबाईल जप्त !

रोशन गव्हाणे, नाशिक
नाशिक शहरात गेल्या काही दिवसात बाईक चोरी जाण्याचं प्रमाण वाढलंय.

अनेकदा ह्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होतात.

मात्र तरीही या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असतं

गुन्हे शोध पथकाने अशाच एका चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एकूण ९ बाईक्स, १९ मोबाईल आणि आणि एक सोन्याची पोत असा मुद्देमाल जप्त केलाय.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड व शहरात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते, पोलीस आयुक्त दिपक पांडये, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ व नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला या गुन्हेगाराला अटकाव करण्याचे आदेश दिले होते, त्या अनुषंगाने तपास सुरू असतांना पथकातील पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त बातमी समजली की, काही सदर वाहन चोर हा सिन्नर फाटा येथे वाहन विक्रीसाठी येत आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचला असता चार इसम दोन दुचाकी घेऊन आले. त्यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (वय २२) राहणार आडके नगर , जय भवानी रोड, यज्ञेश उर्फ मॅडी ज्ञानेश्वर शिंदे (१९) राहणार देवळाली गाव म्हसोबा मंदीराजवळ, अमन सूरज वर्मा (१९) जय भवानी रोड नाशिकरोड, अक्षय उर्फ आर्या राजेश धामणे (वय २६) राहणार भालेराव मळा जय भवानी रोड असे सांगितले. त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अमन वर्मा याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अनेक ठिकाणावरून मोबाईल चोरीची माहिती देऊन १९ मोबाईल चोरल्याची माहिती दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

ते गुन्हे शोध पथकाने जप्त केले आहे. त्याचबरोबर संशयित आप्पा सदाशिव देवरे राहणार पळसे गाव जिल्हा नाशिक, साजिद शेख या दोन संशयितांनी कडून सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले. एकूण ७ गुन्हे उघडकीस आलेले आहे. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेला विधिसंघर्षत बालक फरार असून त्याच्यासोबत कोठारी कन्या शाळा जेलरोड या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील पोत ओरबाडून नेली होती.

त्याची कबुली मिळाल्यावर आठ ग्रॅम सोन्याची पोत गुन्हे शोध पथकाने जप्त केली आहे. यात एकूण नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

दरम्यान या कामगिरीत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोलीस हवालदार अनिल बाळकृष्ण शिंदे, हवालदार मनोहर शिंदे,अविनाश देवरे, विष्णू गोसावी, संदीप बागल, राकेश बोडके, कुंदन राठोड, सोमनाथ जाधव, केतन कोकाटे आदींनी सहभाग घेतला होता. उपायुक्त विजय खरात, साह्ययक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, आदींनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. यापूर्वीही या शोध पथकाने मोठमोठ्या गुन्ह्याचा शोध लावून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790