नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर हा बंधनकारक आहे. परंतु, नाशिकरांनी आपल्या निष्काळजीपणातून मास्कचा वापर बंद केला आहे. म्हणून जे लोक मास्क वापरत नाहीत. त्यांच्यावर प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे साडे चारशे लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
आतापर्यंत विशेष न्यायालयांनी हे खटले निकालात काढून सहा ते सात जणांना दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यांमध्ये १ ते १० हजारांचा दंड संबंधित लोकांनी भरला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी झालेला असला तरी, अजून कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. हे नागरिक कदाचित विसरूनच गेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे व मास्कचा वापर अनिवार्य आहे. बाजारपेठांध्ये सर्रास खरेदी करताना लोक दिसतात पण ते कोणत्याही प्रकारची खबरदारी घेताना दिसत नाहीत. व यावर दुकानदारही काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती आहे.