मस्तच… कर्मयोगीनगर, गोविंदनगरमध्ये आता रात्रीची घंटागाडी सुरू

मस्तच… कर्मयोगीनगर, गोविंदनगरमध्ये आता रात्रीची घंटागाडी सुरू

नाशिक (प्रतिनिधी): सकाळी लवकर घराबाहेर पडणार्‍या रहिवाशांच्या सोयीसाठी महापालिकेने गुरुवारपासून कर्मयोगीनगर, गोविंदनगर भागात रात्रीची घंटागाडी सुरू केली आहे.

यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

मागणीची दखल घेवून कार्यवाही केल्याबद्दल शिवसेना आणि सत्कार्य फाउंडेशनने महापालिका प्रशासक रमेश पवार यांचे आभार मानले आहेत.

या घंटागाडीचे ठिकठिकाणी रहिवाशांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रहिवाशी भागात नाशिक शहरातील हा पहिलाच उपक्रम आहे. दिवसाची घंटागाडी नियमित सुरू राहणार आहे.

गोविंदनगर, कर्मयोगीनगर, उंटवाडी, बडदेनगर, जुने सिडको या भागात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग आढळतात. महापालिका कर्मचार्‍यांनी वेळोवेळी कचरा उचलूनही येथे कचरा टाकला जातो. सकाळी लवकर घराबाहेर पडणार्‍या रहिवाशांना दिवसा सकाळी दहानंतर व दुपारी येणार्‍या घंटागाडीत कचरा टाकणे शक्य होत नाही.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रात्रीची घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. याची दखल घेवून महापालिकेने प्रभाग क्रमांक २४ मध्ये दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत घंटागाडीची सेवा सुरू केली आहे. या घंटागाडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, शीतल गवळी, सुलोचना पांडव, चित्रा रौंदळ, अपर्णा खोत, उज्ज्वला सोनजे, विनोद पोळ, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, राधाकृष्ण जाधव, सखाराम देवरे, बापुराव पाटील, हिरालाल ठाकुर, दिलीप खोडके, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, सुदाम निकम, भालचंद्र पारखे, मिनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, माया पुजारी, अनिता निकम, मंगला देवरे, मंगल खैरनार, संगिता दोडके, भारती देशमुख, अशोक पाटील, प्रदीप जाधव, राधाकृष्ण नटाळ, प्रल्हाद सोनार, प्रदीप पवार, अशोक देवरे, दिलीप निकम, राजेंद्र विभुते, राजेंद्र कारभारी, शकुंतला कुलकर्णी, दिपा सिंग, शितल जैन, लता काळे, ज्योत्स्ना जाधव, स्मिता गाढवे, रूपाली मुसळे, विजया पाटील, कलावती पाटील, निशा ठाकरे, आरती देशमुख, साधना म्हस्के आदींसह गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क परिसरातील रहिवाशी हजर होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790