जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
मनसे अध्यक्ष आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या मास्क न घालण्याची भूमिकेवर ते ठाम असल्याचे चित्र दिसून आले, तर स्वागतासाठी असलेल्या मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांना देखील राज यांनी मास्क काढण्यासाठी सांगितले. हे बघता उपस्थित अनेक मनसे पदाधिकारी दिलीप दातीर आणि इतर मनसैनिकांनी चेहऱ्यावर लावलेले मस्कच काढून टाकले.
राज ठाकरेनी पुन्हा मास्क न घालता कोरोनाचे नियम मोडल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याची उत्सुकता होती, आज राज ठाकरे यांच हॉटेल एक्सप्रेस इन येथे स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या ह्या सुचनेकडे पाहता चक्क बऱ्याच मनसैनिकांनी तोंडाला लावलेले मास्कच काढून टाकले होते. मनसेचे पदाधिकारी दिलीप दातीर यांनी देखील मास्क काढून राज ठाकरे यांचे स्वागत केले,तर इतर मनसैनिकांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत परिधान केलेले मास्क काढून टाकत राज ठाकरेंचे स्वागत केले.
एकीकडे शासनाने वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी बंधन आणि नियमावली जारी केली आहे,तर शहरात मास्क न घालणाऱ्या सर्वसामान्य जनतेकडून दंड आकारला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांत लाखो रुपयांचा दंड मास्क परिधान न केलेल्या नागरिकांकडून वसूल केला आहे,तर मग नेमकं ह्या नियमावली सर्व सामान्य जनतेलाच का?नेते पुढारी यांना का नाही ? असा प्रश्न नागरिक विचारात आहे.