नाशिक (प्रतिनिधी): थर्टी फस्ट व न्यू इयर साठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार असून ड्रंक अँन्ड ड्राईव्ह करणाऱ्यांवरवर नाकेबंदीमध्ये कारवाई करण्यात येणार आहे.
मद्य पिऊन गाडी चालवताना कोणी आढळले तर चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याची रवानगी थेट कोठडीत करण्यात येणार आहे. कारवाई करण्याआधी त्या संबंधित व्यक्तीची सिव्हील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्था कायदा अंतर्गत आणि मद्य पिऊन गाडी चालवताना सापडला म्हणून ड्रंक अँन्ड ड्राईव्ह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर नाकेबंदीचे पॉइंट्स लावण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.