फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीकडून एक लाखाचा अपहार

फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीकडून एक लाखाचा अपहार

नाशिक (प्रतिनिधी): फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीने कर्जदारांकडून मासिक हप्त्याची रक्कम घेत कंपनीमध्ये जमा न करता अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संशयित विवेक राजू खरात (रा. नाशिकरोड) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पंकज घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीराम सिटी फायनान्स लि. कंपनीमध्ये वसुली प्रतिनिधी असलेले विवेक खरात यांनी कर्जदारांकडून जमा केलेली रक्कम कंपनीमध्ये जमा न करता तिचा अपहार केला. याबाबत खरातला नोटीस देण्यात आली होती. तरीही रक्कम न भरल्याची तक्रार घुगे यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात दिली. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: अभ्यास येत नाही म्हणून सावत्र बापाकडून पाच वर्षांच्या चिमुरडीला चटके..
Weather Alert: अरबी समुद्रात ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – पालकमंत्री छगन भुजबळ

Loading

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790