पोलिसांनी सापळा रचून २४ तासांच्या आत चोरांना पकडले!

नाशिक (प्रतिनिधी): रोज चोरी झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या जात असतात. त्यावर पोलिसांकडून कारवाई देखील होत असते. हे चक्र असच सतत सुरु असते. ह्या चोऱ्या म्हणजे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असते. १२ व १३ तारखेदरम्यान महात्मा नगर परिसरातील एक बोलेरो गाडी चोरटयांनी चोरी केली. तिची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये झाली. त्यानंतर पोलिसांनी आपले सूत्र हलवायला सुरुवात केली.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्नॅचिंगचे एकूण २० गुन्हे उघड, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

यावर गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला असता त्यांना सदर गाडी हि पिंपळगाव टोलनाक्याकडे जाताना दिसल्याचे समजले. त्या अनुषंगाने तपास करत असतांना गाडी विशाल घनगाव या इसमाने चोरली असून ती त्याने त्याच्या मामाचा मुलगा बारकू शिंदे याच्याकडे विकण्याकरिता दिली असल्याचे समजले. त्या मुलाने ती गाडी चांदवड येथे विकण्यास नेली असल्याचे समजल्यावर खात्री करण्यासाठी पोलीस त्या ठिकणी गेले असता त्यांना गाडी तिथे आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी पुढील तपास चालू ठेऊन वेगवेगळ्या कड्या जोडून शेवटी गाडी चोरी केलेल्या व्यक्तीला पकडून त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी गाडी मिळवली. व त्या प्रकरणातील इतर गुन्हेगारांना देखील कामगार नगर,सातपूर या ठिकणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, संपूर्ण कारवाई अवघ्या २४ तासांमध्ये पार पाडण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790