पुलावरून आत्महत्या करताना ज्याला वाचविले, काही दिवसांनी त्यानेच घेतली जळत्या चितेवर उडी
नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसापूर्वीच मुंबई-आग्रा महामार्गावरील कादवा नदी पात्राच्या पुलावरून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यात आले होते.
मात्र याच व्यक्तीने सोमवारी रात्री अंत्यविधीच्या आगीत पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याला वाचविण्यात आले आहे.
पिंपळगाव बसवंत येथील निफाड रोड वरील अमरधाम येथे सोमवारी रात्री दहा वाजता एक अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपला.
याचवेळी एक व्यक्ती जळत्या चितेजवळ आली आणि जीव झोकून देण्यासाठी चीतेकडे जाऊ लागली. यानंतर स्थानिकांच्या मदतीने या व्यक्तीला वाचविण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्हयातील पिंपळगाव बसवंत येथील अमरधाम परिसरात सोमवारी रात्री अंत्यविधीचा कार्यक्रम झाला. अग्निडाग दिल्यानंतर सर्व नातेवाईक घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र या परिसरात एक व्यक्ती संशयित रित्या फिरताना अमरधाममध्ये काम करणाऱ्या पंकज इरावत यांनी बघितले.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10417,10415,10410″]
पंकज इरावत याने या व्यक्ती बाबत अंत्यविधीसाठी आलेल्या काही नातेवाईकांना विचारपूस केली असता त्याला कोणीही ओळखत नसल्याचे सांगितले. याचदरम्यान, या व्यक्तीने जळत्या चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला पकडून बाजूला केले. त्यानंतर पोलिसांना याबबतची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता आत्महत्या करणारा हा कादवा नदीवरून उडी मारणारा असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर सदर व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे नातेवाईकांना विचारपूस केली असता कौटुंबिक वादातून याअगोदर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले आहे.