नाशिक (प्रतिनिधी): विवाहित महिलेला पती व मुलाला ठरण्याची धमकी देत तिच्या घरात बळजबरीने प्रवेश करून अत्याचार केल्याचा प्रकार तिबेटीयन मार्केट परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी संशयित नवीन सुनील गायकवाडच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित नवीन गायकवाड याने ओळखीचा गैरफायदा घेत तू माझ्याशी प्रेम संबंध ठेव नाही तर तुझी समाजात बदनामी करेल, तुझे फोटो तुझ्या पतीला पाठवेल, नाही म्हटली तर तुझा पती आणि मुलगा दोघांस ठार मारण्याची धमकी देत घरात बळजबरीने प्रवेश करून बलात्कार केला. घडलेला प्रकार पतीला सांगितला याचा जाब विचारण्यासाठी पती गेले असता संशयित संदेश गायकवाड, व संशयितांची आईने मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली.अशी तक्रार पोलिसांत दिली. या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला.संशयित नवीन गायकवाड यास अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.