नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी भागात महिला लग्नासाठी जात असतांना तिच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरटयांनी हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी सुवर्णा मनोहर भागवत (वय ५१,) या अयोध्या नगरी प्लॉट क्रमांक ८९२, श्रमश्री बंगला आव्हाडमळा, चेतनानगर परिसरात राहतात. मंगळवारी (दि.५ जानेवारी) रोजी श्रीहरी कृष्ण हाईट बिल्डिंगच्या समोर, डेकोर प्लायवुड दुकानाजवळ, तपोवनरोड, पंचवटी परिसरात फिर्यादी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गाडीतून उतरल्या. दरम्यान, त्या लॉन्सकडे जात असतांना रस्त्यावर एक काळ्या रंगाची मोटार सायकल येऊन थांबली. दुचाकी चालक अनोळखी असून, त्याने काळ्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला होता. दरम्यान, त्या अनोळखी इसमाने फिर्यादींकडे जाऊन त्यांच्या गळ्यातील ९५ हजार किंमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेऊन, पोबारा केला.