सातपूर (नाशिक) : सातपूर अशोकनगर परिसरात युनियन बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.
या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी चार परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अशी माहिती सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली.
शनिवारी (ता. २५) पहाटे पाच वाजेच्या सुमारास अशोकनगर येथील युनियन बँक व महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही संशयित आले व त्यांनी एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला.
फोडण्याचा प्रयत्न करताच सायरन मुंबई ऑफिसमध्ये वाजला. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, हवालदार संजय शिंदे, पोलिस नाईक शरद झोले, अंमलदार अनंता महाले, शिपाई संभाजी जाधव आदींसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवत चार परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेतले. अजून काही संशयितांचा यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.