नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ध्रुवनगर परिसरात राहणाऱ्या १५ वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळफास लावून घेत आ त्म ह त्त्या केली. सदरची घटना बुधवारी (ता. ७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
राज सतिश शेलार (१५, रा. शिवशक्ती ब्लॉसम रो हाऊस, ध्रुवनगर, गंगापूर शिवार) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राज हा दहावीच्या वर्गात शिकत होता. बुधवारी (ता.७) दुपारी शाळेतून आल्यानंतर तो बेडरुममध्ये गेला आणि सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आ त्म ह त्त्या केली.
सदरची बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, राजने शाळेतील किंवा मित्र परिवारातील अज्ञात कारणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र अद्याप मृत्युचे स्पष्ट कारण समजू शकलेले नाही. राजच्या आत्महत्त्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.