नाशिक: सहा वर्षांची चिमुरडी उंबरा ओलांडत होती, अशातच बिबट्याने झडप घातली, अन्….

नाशिक: ह्रदयद्रावक घटना;  बिबट्याच्या हल्ल्यात 6 वर्षीय बालिका ठार…

नाशिक (प्रतिनिधी): तालुक्यातील दुगारवाडी धुमोडी वेळुंजे ब्राम्हणवाडे पाठोपाठ आता ब्राम्हणवाडे जवळील पिंपळद (त्र्यंबक) येथील ही पाचवी घटना आहे. पिंपळद येथील लहान मुलगी देवीका भाऊसाहेब सकाळे वय 6 वर्ष, रा. सकाळे मळा, पिंपळद (त्र्यं) सायंकाळ होत असतांना व सुर्य मावळला नसला तरी दिवसा साडे पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान देविका व तिची मोठी बहिण पिंपळद गावातुन आपल्या घरी सकाळी मळ्यात जात असतांना घरात घुसण्यापुर्वीच मळ्याच्या झाडीत दबा धरुन सावजाची वाट पाहत बसलेल्या बिबट्याने बहिणीसमोर झडप घालुन देविकास पकडुन नेले. या हल्ल्यात देविका ठार झाली.

विशेष म्हणजे आतापर्यंत केवळ लहान मुले मुलीच बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडले आहेत.

याच टापुतील आतापर्यंत ही पाचवी घटना आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

लोक दहशतीच्या वातावरणात वावरत आहेत. जखमी मुलीस त्वरीत त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथील डाॅ.भागवत लोंढे यांनी तपासुन मृत असल्याचे घोषित केले. खबर कळताच पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व त्यांची सर्व टीम घटना स्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने फोन करुन पाच पिंजरे मागवले आणि ते आजच्या आज युध्द पातळीवर बसविले जाणार आहेत.

एकापेक्षा अनेक बिबटे या परिसरात असल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे. वन अधिकारी हे बिबटे पिंजरा लाउन जेरबंद करतात पण ते सोडताना दूरच्या जंगलात सोडतात की परत जवळच्याच जंगलात सोडतात हे करण्यास मार्ग नाही. कारण बिबट्याचा वावर याच परीसरात आहे.

दरम्यान मुलीच्या मानेला डोक्याच्या कपाळावर डाव्या हाताच्या कांबीवर पोटावर बेंबीजवळ असे ठिकठिकाणी बिबट्याच्या दाताच्या व नखांच्या जखमा आहेत. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात पिंपळद व त्र्यंबककरांची प्रचंड गर्दी होती. संपतराव सकाळे, तहसीलदार दिपक गिरासे, डॉ.भागवत लोंढे, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते.

थोडक्यात:
पिंपळद शिवारात सकाळे वस्ती आहे. या वस्तीत भाऊसाहेब सकाळे यांच्या कुटुंबासह इतर सकाळे कुटुंब वास्तव्यास आहे. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रगती ही घरी असताना शेजारीच असलेल्या चुलत्याच्या घरी जात होती. हे अंतर अवघे एक ते दोन मिनिटांचे. मात्र दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून घरातील सर्व बाहेर आले. यावेळी बिबट्याने धूम ठोकली. मात्र हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790