नाशिक: हातात कोयता घेऊन टोळक्याची दहशत; 7 जणांवर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): शिवाजीनगर भागात टोळक्याने धारदार शस्त्राचा धाक दाखवत परिसरात दहशत माजविल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २०) रात्री घडला.

शिवीगाळ करीत टोळक्याने एका दुकानाच्या शटरवर कोयता मारून नुकसान केले असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज संजय औतारी (रा. भाजी मार्केट जवळ, शिवाजीनगर), आकाश रोशन औताडे (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) व पाच ते सहा साथीदार अशी दहशत निर्माण करणाऱ्या संशयित टोळक्यातील संशयित आरोपींची नावे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

याप्रकरणी विक्रम देवरे (रा. शिवाजीनगर) या व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. धारदार शस्त्र घेऊन आलेल्या टोळक्याने मंगळवारी रात्री भडांगे हॉस्पिटल भागात दहशत माजवीत नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करीत टोळक्याने देवरे यांच्या दुकानाच्या शटरवर कोयता मारला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790