नाशिक: सिटी सेंटर मॉल जवळ रस्ता खचल्याने एकेरी वाहतूक
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे.
अशातच आता सिटी सेंटरजवळ रस्ता खचल्याची बातमी समोर येतेय…
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल रस्त्यावर असलेल्या आरडी सर्कल भागातील रस्ता खचला.
जवळच सुरू असलेल्या बांधकामामुळे कदाचित हा रस्ता खचल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी तातडीने येथे भेट दिली आणि आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या. मनसेचे अक्षय खांडरे यांच्यासह स्थानिक युवकांनी या भागात येणाऱ्या वाहनचालकांना याबाबत जागृत केले. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, येथे फक्त एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या मार्गावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांनी याची काळजी घेण्याची आवाहन प्रशासनातर्फे घेण्यात करण्यात आले आहे.