नाशिक: सिटी सेंटर मॉलजवळ दुचाकी झाडावर धडकून दोन युवक ठार
नाशिक (प्रतिनिधी): ट्रीपल सीट मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना एबीबी सर्कलनजीक घडली आहे.
याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार विजय खैराते यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी विशाल संजय मराठे (वय २०, रा. मु. पो. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हा त्याच्या ताब्यातील एमएच १५ जीपी ६२०४ या क्रमांकाची मोटारसायकल काल एबीबी सर्कलकडून सिटी सेंटर मॉलकडे ट्रीपल सीट जात होता. ही भरधाव मोटारसायकल लक्षिका लॉन्सच्या समोर दुभाजकाजवळ असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात दुचाकीचालक विशाल मराठे याच्यासह मागे बसलेला विष्णू प्रमोद जोशी (वय १८) हे दोघे जण ठार झाले, तर त्यांचा तिसरा साथीदार हर्षल रवींद्र शिरसाठ (वय २२, रा. श्रमिकनगर, सातपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790