Ad: तुमच्या व्यवसायाची जाहिरात पोस्ट करा नाशिक कॉलिंगवर…
नाशिक (प्रतिनिधी): चार दिवसांपूर्वी कट्या मारुती पोलीस चौकीसमोर वाघाडी पुलाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका ५३ वर्षीय पादचाऱ्याला पंचावातीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या सिटी लिंक बसने धडक दिली होती.
या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
पंचवटीतील नाग चौकातील रहिवासी हरीश रामदास कानडे (वय: ५३, राहणार: जोशीवाडा) असे मयत झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी कानडे हे वाघाडी येथील पुलावर पायी रस्ता ओलांडत होते. याचवेळी सिटी लिंकची शहर बसने कानडे यांना धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी (दि. १८) सायंकाळी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा सोमवारी बस क्रमांक आदी माहिती पोलिसांकडून उपलब्ध होऊ शकली नाही.
- नाशिक: दारूचे पैसे मागितले म्हणून बारचालकासह तिघांना कोयत्याने मारहाण…
- नाशिक: बालिकेचा शॉक लागून मृत्यू; दीड महिन्यानंतर दुकानमालकाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान परिसरातील या मुख्य रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणीसुद्धा पुढे येत आहे.
![]()


