नाशिक (प्रतिनिधी): शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पास केंद्रात वाढ केली आहे. शाळांना सुटी असल्याने पास केंद्राची संख्या कमी करण्यात आली होती.
वाढणारी विद्यार्थी संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा पास केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. एकूण सहा पास केंद्रे उघडण्यात आली आहे.
केटीएचएम महाविद्यालय पास केंद्राची वेळ सकाळी आठ ते सांयकाळी चारपर्यंत आहे. निमाणी येथे यापूर्वी एक पास केंद्र सुरू होते. आणखी एक पास केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
सकाळी आठ ते ते सायंकाळी सहा अशी वेळ आहे. नाशिक रोड येथे सकाळी नऊ ते सांयकाळी पाचपर्यंत एक पास केंद्र आहे. सिटीलिंक मुख्यालयात तीन पास केंद्रे असून सकाळी आठ ते सांयकाळी सहा ही वेळ आहे.
सद्यःस्थितीत एकूण चार ठिकाणी सहा पास केंद्र सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन पास केंद्रावर गर्दी झाल्यास आणखी पास केंद्रदेखील सुरू केले जाणार आहे.
पास संदर्भात अडचणी असल्यास सिटीलिंक हेल्पलाइन क्रमांक ८५३००५७२२२ किंवा ८५३००६७२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.