[language-switcher]
नाशिक: सरकारी नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत पावणे तीन कोटींची फसवणूक
नाशिक (प्रतिनिधी): सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अनिल अशोक आव्हाड (वय 34, रा. व्हॅलेंटाईन सोसायटी, देवळाली कॅम्प, ता. जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी सुशील भालचंद्र पाटील (वय 35, रा. लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, नाशिक) याने फिर्यादी अनिल आव्हाड व त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले.
तसेच फिर्यादी आव्हाड यांचा विश्वास संपादन केला. सरकारी नोकरी मिळेल, या आशेने फिर्यादी आव्हाड व त्यांच्या नातेवाईकांनी आरोपी पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे ठरलेली रक्कम देण्याचे निश्चित केले.
- नाशिक: दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.. कुटुंबांवर शोककळा
- विवाहित प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला नाशिकमध्ये अटक!
- भिमानास्पद! सिन्नरच्या देवपूर गावातली पहिली मुलगी झाली डॉक्टर; गावकऱ्यांनी वाटले पेढे
दरम्यान, दि. 1 जानेवारी 2018 ते दि. 5 एप्रिल 2023 यादरम्यान देवळाली कॅम्प व पंचवटी येथील घरी आरोपी सुशील पाटील याने वेळोवेळी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून 2 कोटी 76 लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारली; मात्र बरेच दिवस उलटूनही नोकरी लागण्याची चिन्हे दिसली नाहीत. म्हणून फिर्यादी यांनी आरोपी पाटील याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व 2 कोटी 76 लाख रुपये घेऊन फसवणूक केली.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी सुशील पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.