नाशिक: संतप्त दोघांनी जेठ आणि भावजयीस केली बेदम मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): गायकवाडनगर भागात आरडाओरड करण्यास मनाई केल्याने संतप्त दोघांनी जेठ आणि भावजयीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
दत्ता रामभाऊ खडसे (२४) व विठ्ठल भरत मानवतकर (१९ रा.दोघे बाफना हाऊस समोर,गायकवाडनगर) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत.
राजकुमारी राजेंद्र कोल (२७ रा.मुळ मध्यप्रदेश हल्ली सदर) या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
या घटनेत कोल यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्यात आल्याने ती जखमी झाली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10995,10989,10992″]
संशयित आणि तक्रारदार महिला बाफना हाऊस समोर जवळ जवळ सुरू असलेल्या दोन बांधकाम साईटवरील कामगार आहेत. दोघा बांधकाम व्यावसायीकानी सुरक्षा रक्षकांसाठी आपल्या साईटवरच राहण्याची व्यवस्था केली आहे. कोल कुटूंबिय बुधवारी आपल्या घरात असतांना शेजारच्या बिल्डींगचे वॉचमन राजाराम खंदारे यांची मुलगी विशाखा व जावई दत्ता खडसे त्यांच्यात वाद सुरू होता. खडसे दांम्पत्य आरडाओरड करून भांडण करीत असतांना जखमी महिलेचा जेठ महेंद्र कोल हे खडसे दांम्पत्यास आम्ही दिवसभर काम करतो, आम्हाला झोपू द्या अशी आरडाओरड करून असे समजून सांगण्यासाठी गेले असता ही घटना घडली.
समजून सांगण्याचा राग आल्याने संतप्त खडसे व त्याच्या समवेत असलेल्या मानवतकर यांनी महेंद्र कोल यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी भावजयी राजकुमारी कोल या पतीच्या मोठ्या भावाच्या बचावासाठी धावून गेल्या असता संशयितांनी त्यांनाही मारहाण करीत साईडवरील लोखंडी रॉड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. या घटनेत कोल यांना मोठी दुखापत झाली असून अधिक तपास जमादार केशव आडके करीत आहेत.