नाशिक: शिक्षकांच्या पाल्यांसाठी ” लेगसी ” ची विशेष स्कॉलरशिप योजना…

नाशिक (प्रतिनिधी): शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक, निवास स्वरूपात, किंवा अन्य मार्गाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दिलेली मदत म्हणजे शिष्यवृत्ती.
प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीपासून शिष्याची वृत्ती शिक्षणाकडे टिकून राहावी यासाठी केलेले प्रयत्न शिष्यवृत्ती या नावाने ओळखले जातात.
शाळा,महाविद्यालये येथे शासकीय योजनांमधून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात, मात्र खाजगी क्षेत्रात त्या फारशा राबवल्या जात नाहीत.
प्रत्येक पाल्याला शैक्षणिक प्रायोजक मिळतोच असेही नाही. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा प्रथमच सुरू होत आहे.
या योजनेमुळे शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थी अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
श्रेयस कुलकर्णी संचलित लेगसी एज्युकेटर्स ( पूर्वीचे एस के ई आय ) ने ही योजना प्रथमच जाहीर केली आहे. या समूहाने दिनांक 1 जुलै 2022 रोजी पाचव्या वर्षात पदार्पण केले. चार पिढ्या शिक्षण क्षेत्रात असणारा शहरातील हा एकमेव समूह आहे, वर्धापन दिनाच्या निमित्ताने ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.
शाळा महाविद्यालयांमध्ये नोकरीस असणाऱ्या, 35 ते 40 वर्षे चिकाटीने नोकरी करणाऱ्या, शिक्षकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक विकासास हातभार लावणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी योजनेमागील मुख्य हेतू असल्याची माहिती संचालक श्रेयस कुलकर्णी यांनी दिली. अकरावी कॉमर्स पासून लेगसी मध्ये पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू असेल.
लेगसी जुनियर्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या शिक्षक पाल्यांना स्कॉलरशिप, अबॅकस व तत्सम शिक्षण घेणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. शिक्षक पाल्यांना लेगसी च्या फी मध्ये 25% थेट सवलत दिली जाईल, तसेच एकूण फी च्या 25% रक्कम शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊन निकाल लागल्यानंतर परत केली जाईल असे या योजनेचे स्वरूप आहे.
योजनेसंबंधी अधिक माहिती 9359843512 या मोबाईल क्रमांकावर मिळू शकेल. केवळ वीस विद्यार्थ्यांची बॅच याप्रमाणेच प्रवेश पद्धती असल्यामुळे मागील चार वर्षात पालक आणि विद्यार्थ्यांचा या समूहास उत्तम प्रतिसाद लाभला आहे. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पालक आणि शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शिक्षणाचे बाजारीकरण रोखले तरच गुणवत्ता टिकेल, आणि त्यातून राष्ट्राची बौद्धिक संपदा विकसित होईल असे प्रतिपादन टीम लेगसी च्या वतीने श्रेयस कुलकर्णी यांनी केले.
शासनाने जाहीर केलेली यापूर्वीची चारही शैक्षणिक धोरणे आमच्या पिढीने अनुभवली असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.