नाशिक (प्रतिनिधी): एम. बी. बी. एस. साठी सरकारी कोट्यातून अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ओरिसाच्या एका इसमाने एक लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोषकुमार हरिचंद्र पाणीग्रही (रा. बी. सी. रोड, जयकापूर, रायगड, ओरिसा) असे फसवणूक करणार्या इसमाचे नाव आहे. संतोषकुमार पाणीग्रही याने फिर्यादी लक्ष्मण हनुमंता तांबोळी (रा. राजमुद्रा अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्याशी संपर्क साधला. त्यादरम्यान, “तुमच्या मुलीचे एम. बी. बी. एस. साठी शासकीय कोट्यातून अॅडमिशन करून देतो,” असे फिर्यादी तांबोळी यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर तांबोळी यांचा विश्वास बसला.
नाशिक: शिवीगाळ करण्याच्या शुल्लक कारणावरून सख्या भावाचा खून
दरम्यान, संशयिताने 7 सप्टेंबर 2022 ते दि. 5 मे 2023 या कालावधीत पाथर्डी फाटा येथील स्टेट बँकेच्या शाखेत फिर्यादी तांबोळी यांच्याकडून एक लाख रुपयांची रक्कम घेतली; मात्र बरेच दिवस उलटूनही मुलीचे अॅडमिशन होत नसल्याने त्यांनी आरोपी पाणीग्रही याच्याकडे विचारपूस केली असता त्याने टाळाटाळ केली. अॅडमिशन न करता पैसे घेऊन फसवणूक केली.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संतोषकुमार पाणीग्रही याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.