नाशिक शहरातील ‘या’ भागात २१ जून रोजी पाणीपुरवठा बंद राहणार !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक रोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंड मधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाची (मुख्य उर्ध्ववाहीनी) 600 मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. या गळतीचे काम करण्यासाठी खालील प्रभागातील एक दिवसाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' मार्गावरील वाहतुकीत पुढील तीन महिने महत्वाचे बदल

प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर

प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तीन दिवसांत घरफोडीचा उलगडा; २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन आरोपी अटकेत

प्रभाग क्र.19- गोरेवाडी, शास्त्री नगर

प्रभाग क्र.20- पुनारोड परीसर, राम नगर, विजय नगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कला नगर, आशा नगर, जिजामाता नगर,

तरी बुधवार दिनांक 21 जून रोजी वरील प्रभागात सकाळचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही व सायंकाळचा कमी दाबाने होईल. याची येथील नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790